रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये 46 नवे पॉझिटीव्ह




अकोला,दि.16(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्हयात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 467 चाचण्यामध्ये 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे  अकोट येथे 57 चाचण्या झाला त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 20 जणांच्या होवून एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. बाळापूर येथे 110चाचण्या झाल्या तेथेही एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पातूर येथे 218 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाशिटाकळी येथे 62 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 467 चाचण्यांमध्ये 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे 67 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ