रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी:जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी केली पाहणी


                        अकोला, दि.९(जिमाका)- अकोला रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर माल चढ उतार व ने आण करतांना रेल्वे व रस्ते वाहतूकीची प्रंचड कोंडी होत असते. त्यामुळे येथील वाहतुक नियमन अधिक सुकर व्हावे यासाठी रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी सुरु असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी संयुक्तरित्या अकोला व शिवणी येथील रेल्वे मालधक्क्याची पाहणी केली.
            यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांचेसमवेत जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी निलेश अपार,  अकोला रेल्वे स्टेशन मॅनेजर .एस. नांदुरकर, मुख्य वाणिज्य विभागाचे  यामीन अन्सारी, अकोला रेल्वे स्टेशन येथील मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक एम.बी. निकम, तहसिलदार विजय लोखंडे  दी रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            अकोला रेल्वे स्टेशनवरील मालधक्कावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यावरील ताण कमी व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात नियोजन सुरु आहे. त्यासाठी सुयोग्य जागांची चाचपणी रेल्वे, महसूल व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांनी अकोला रेल्वे स्टेशनवरील मालधक्यांची पाहणी करुन रेल्वे अधिकारी यांच्याशी पर्यायी जागेबाबत चर्चा केली.  त्यानंतर त्यानी शिवणी रेल्वे स्टेशन येथील जागेची व तेथे करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत पाहणी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना