316 अहवाल प्राप्त;22 पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.13(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 316 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 294 अहवाल निगेटीव्ह तर 22 अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1901(1880+21)  झाली आहे. आज दिवसभरात 36 रुग्ण बरे झाले.  तर एकाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 258 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण 14627 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 14164, फेरतपासणीचे 158 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 305 नमुने होते. आजपर्यंत एकूण 14574 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 12694 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1901(1880+21) आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज 22 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आज सकाळी प्राप्त अहवालात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील तिन जण पातूर येथील तसेच नवीन बस स्टँड, गौरक्षण रोड, अकोट  व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गंगा नगर, तेल्हारा, महान, खडकी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन   महिला व चार पुरुष आहेत. हे सर्व सात जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
36 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  आठ, कोविड केअर सेंटर मधून 19 , आयकॉन हॉस्पिटल मधून पाच व हॉटेल रिजेन्सी येथून चार अशा 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले बार्शी टाकळी येथील दोन तर जीएमसी, लहान उमरी, पारस, अकोट, खदान आणि सिंधी कॅम्प  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले.

एकाचा मृत्यू
दरम्यान पातुर येथील 52 वर्षीय पुरुष रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. हे दि. 1 जुलै रोजी दाखल झाली होते. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
258 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण 1901 (1880+21) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 95 जण (एक आत्महत्या व 94 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 1548 आहे. तर सद्यस्थितीत 258 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ