रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ६११ चाचण्या, २२ पॉझिटिव्ह


अकोला,दि.२१(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ६११ चाचण्यामध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज चाचण्या झाल्या नाहीत.  अकोट येथे ३२ चाचण्या झाल्या आणि चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  बाळापूर येथे  ७६ जणांच्या चाचण्या होऊन  एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बार्शी टाकळी येथे १५४ जणांच्या चाचण्या झाल्या व तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे  आज चाचण्या झाल्या नाही.  तेल्हारा येथे १४४ जणांच्या चाचण्या होऊन  चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  मुर्तिजापूर येथे १६०जणांच्या चाचण्या झाल्या त्यात  तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  अकोला मनपा हद्दीत  ४१ चाचण्या झाल्या व सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला येथे चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे एकूण ६११ चाचण्या होऊन त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात ३८१७ चाचण्या झाल्या असून १७६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम