कोविड नियंत्रण कक्षासाठी नविन संपर्क क्रमांक


अकोला,दि.28(जिमाका)- कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे सामान्य जनतेला आजाराविषयी मार्गदर्शन करण्याचे दृष्टीने जिल्हा शल्य चिकीत्सक कक्ष स्थापन करण्यात येऊन संपर्काकरिता दुरध्वनी क्रमांक 0724-2421718 देण्यात आला होता. तो कक्ष रद्द करण्यात आला आहे.
            आता जनतेला कोविड-19 या आजारासंबंधी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास त्याकरिता मार्गदर्शन करण्याकरिता कोविड केअर सेंटर पी.के.व्ही. येथील नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 9403751173 हा आहे. कोणालाही कोविड-19 बाबत माहिती पाहिजे असल्यास सदर संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ