पालकमंत्र्यांनी घेतला समाजकल्याण विभागाचा आढावा



        अकोला,दि.27(जिमाका)- समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमार्फत समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, या योजनाचा जिल्ह्यातील सद्यास्थितीचा आढावा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित या बैठकीस विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्याकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी येवलेकर आदी  उपस्थित होते.
            यावेळी समाज कल्याण विभागामार्फत आश्रमशाळेचे सद्यास्थितीची व तेथील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत यंत्रणेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण कसे देता येईल? याबाबत कार्यपद्धती ठरविण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच खेड्यापाड्यात पाल टाकुन वस्तीने राहणाऱ्या भटक्या लोकांची माहिती संकलित करण्यास सांगुन त्यांच्यासाठी पक्क्या निवाऱ्यासाठी योजना राबविण्याचे निर्देश दिले.
            जिल्ह्यातील दिव्यांग, त्यांच्या दिव्यांगत्वाची कारणे, त्यावरील उपाय, त्यांच्यातील उणीव दुर करण्यासाठी काय करता येईल? यासाठी दिव्यांगाच्यास प्रकारानुसार  वर्गवारी करा, असे निर्देश ना. कडु यांनी दिले. दिव्यांगाच्या कल्याणासाठी असणाऱ्या निधीचा पुरेपूर विनियोग झाला पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेस सांगितले जिल्ह्यातील मुकबधीर व अंधत्व असणाऱ्यांवर उपचार सुविधाबत यावेळी ना. कडू यांनी माहिती घेतली. जिल्हयात नेत्रपेढी उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ