३५५ अहवाल प्राप्त; १० पॉझिटीव्ह, १४ डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.११(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३५५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३४५अहवाल निगेटीव्ह तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८५९(१८३८+२१)  झाली आहे. आज दिवसभरात १४ रुग्ण बरे झाले.  तर एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. आता ३०३ जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १४२०७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३७५७, फेरतपासणीचे १५७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १४१२० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १२२८२ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८५९ (१८३८+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १० पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व आठ पुरुष आहेत. यातील सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील तर उर्वरित खडकी व बोरगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी एकाही जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
१४ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन तर कोविड केअर सेंटर मधून १२ अशा १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यात  तिघे गंगा नगर येथील, मोठी उमरी, छोटी उमरी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित अकोट, घुसर व बार्शीटाकळी  येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या दोन जणांपैकी पोळा चौक व बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
एका महिलेचा मृत्यू
दरम्यान एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ६७ वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ही महिला बाळापूर येथील रहिवासी असून  दि.३ रोजी दाखल झाली होती.
३०३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १८५९ (१८३८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९२ जण (एक आत्महत्या व ९१ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४६४ आहे. तर सद्यस्थितीत ३०३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ