राखी टपालासाठी रविवारी (दि. 2) रोजी खास वितरण व्यवस्था



        अकोला,दि.31 (जिमाका)-  राखी हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा उत्सव आहे. दरवर्षी राखी, टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत अशी अपेक्षा आहे.
            राखीचा सण सोमवार (दि.3) रोजी असल्यामुळे रविवार (दि.2) रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.  राखी सणाचे महत्व गृहीत धरता बहिण भावंडांना कन्टेमेन्ट झोन किवा इमारत सिल झाल्यामुळे अशा विविध निर्बधांमुळे भेट घेता येणार नाही. या कारणाने कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास प्राधान्य दिले आहे आणि स्पीडपोस्‍ट मुळे राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. तरी नागरिकांनी प्राधान्य क्रमाने व वेळेत वितरण होण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा वापर करावा, असे आवाहन प्रवर अधिक्षक, अकोला मंडळ, अकोला यांनी केले आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ