जुने सेवायोजना नोंदणी कार्ड धारकांनी नोंदणी 14 ऑगस्ट पुर्वी अद्यावत करा




अकोला,दि.30(जिमाका)-  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिल्य जाणाऱ्या सर्व सुविधा ह्या ऑनलाईन करण्यात आल्या असून त्याकरिता या विभागामांर्फत www.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टलवर सुरु करण्यात आलेले आहे. या  पोर्टलवर रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता नोंदणी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच जुने सेवायोजन नोंदणी कार्ड धारकांनी शुक्रवार दि. 14 ऑगस्ट पुर्वी आपली नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन प्रांजली बारस्कर, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, अकोला यांनी केले आहे.
ही माहिती अपडेट करण्याकरिता आपणास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या नोंदणी कार्डचे अपडेशन आपल्या मोबाईल, लॅपटॉप, सायबर कॅफे वरुन करु शकता. जर आपणास काही अडचण निर्माण झाल्यास आपण कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर 0724-2433849 वर संपर्क साधून माहिती विचारु शकता. जर नोंदणी मधील डाटा अपडेट न केल्यास जून्या नोंदणी असलेल्या उमेदवारांची सेवायोजना नोंदणी 15 ऑगस्ट पर्यंत रद्द होणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ