२४६ अहवाल प्राप्तः ३८ पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज, एक मयत
अकोला,दि.५(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २४६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २०८ अहवाल निगेटीव्ह तर ३८ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १७०३ झाली आहे. आज दिवसभरात तीन रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३५६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२३२७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११९२८, फेरतपासणीचे १५२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२२३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०५३५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १७०३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३८ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३८जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात आज सकाळच्या अहवालात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील,सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट,पाच जण चांदुर,दोन जण बार्शी टाकळी, दोन जण कच्ची खोली तर उर्वरित राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव,पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तर सायंकाळी एकाही व्यक्तीचा
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तिघांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला.हे रुग्ण गाडगे नगर, इंदीरा कॉलनी व वाशीम बायपास येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले.
एकाचा मृत्यू
दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील ८२ वर्षीय पुरुष असून तो दि.२ रोजी दाखल झाला होता.काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १७०३ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८९ जण (एक आत्महत्या व ८८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२५८ आहे. तर सद्यस्थितीत ३५६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा