21 अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 60 डिस्चार्ज, एक मयत



अकोला,दि.25 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 321 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 292 अहवाल निगेटीव्ह तर  29 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2383(2140+243) झाली आहे. आज दिवसभरात 60 रुग्ण बरे झाले. आता 317 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17816 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 17291, फेरतपासणीचे 164 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  361  नमुने होते. आजपर्यंत एकूण 17687 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  15547 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2383(2140+243) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 29 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील 12 जण हे अकोट येथील रहिवासी आहेत. तर तीन जण शास्त्री नगर, दोन जण रामनगर, दोन जण केशव नगर, तर उर्वरित बाबुलगाव ता. बार्शीटाकळी, जेलक्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रीतनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  एक महिला व चार पुरुष आहेत. त्यात दोन जण पारस, अकोला, दोन जण सिरसार मुर्तिजापूर तर मलकापूर, अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
60 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  अकोट व पातूर येथील प्रत्येकी दोन जणांना तर जीएमसी अकोला व ओमनगर नांदुरा येथील प्रत्येकी एक अशा एकूण सहा जणांना घरी पाठविण्यात आले, कोविड केअर सेंटर अकोला येथून 46 जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण तर आयकॉन हॉस्पीटल मधून दोन जणांना अशा एकूण 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगानगर, अकोला येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. ११ जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
317 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2383(2140+243) आहे. त्यातील  जण 100 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  1966 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 317 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ