३७ पॉझिटीव्ह, डिस्चार्ज ४७, एक मयत


अकोला,दि.७(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११८ अहवाल निगेटीव्ह तर १६ अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्यासोबतच रॅपिड टेस्ट मधून गेले दोन दिवसात २१ जण पॉझिटीव्ह आले आहेत, त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १७७९  झाली आहे. आज दिवसभरात ४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज दुपारनंतर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजअखेर ३५६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२८४६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२४३७, फेरतपासणीचे १५३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२७४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०९८८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १७५८ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या २१ रुग्णांची संख्या यात समाविष्ट केल्यानंतर आता १७७९ इतके पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत.
आज ३७ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आणि रॅपिड टेस्ट मध्ये गेल्या दोन दिवसांत २१ जणांचे असे मिळून एकूण ३७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
सकाळच्या शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ७ महिला तर ९ पुरुष रुग्ण आहेत. त्यात कच्ची खोली येथील पाच जण, अकोट येथील तीन जण, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जीएमसी, पक्की खोली,  आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी  एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
रॅपिड टेस्ट मध्ये रविवार दि.४ (११) व सोमवार दि.५ (१०) या दोन दिवसांत पातूर येथील २१ जण पॉझिटीव्ह आले आहेत. ही रुग्ण संख्या आजच्या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आजची पॉझिटीव्ह संख्या ३७ झाली आहे.
४७ जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सकाळी दोघे व दुपारनंतर पाच जणांना अशा सात जणांना तर ४० जणांना कोविड केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या सात जणांपैकी  सिंधी कॅम्प येथिल तीन जण, अकोट, गाडगे नगर, हनुमान नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथून घरी सोडण्यात आलेल्या ४० जणांपैकी  तारफैल येथील दहा जण, छोटी उमरी, कळंबेश्वर व अकोट येथील प्रत्येकी पाच जण, गजानन नगर येथील चार जण पिंपळखुटा आणि जुने शहर येथील प्रत्येकी दोन जण,  मळसुळ, अयोध्या नगर, खदान, गाडगेनगर, कामा प्लॉट, बोरगाव मंजू आणि डाबकी रोड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथुन देण्यात आली.
एका महिलेचा मृत्यू
दरम्यान आज खैर महम्मद प्लॉट येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेस दि. २७ जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.  तिचा आज मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १७७९ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९० जण (एक आत्महत्या व ८९ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३३३ आहे. तर सद्यस्थितीत ३५६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना