१३८ अहवाल प्राप्त; २० पॉझिटीव्ह, ४८ डिस्चार्ज, दोन मयत

अकोला,दि.१२(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११८ अहवाल निगेटीव्ह तर २० अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८७९(१८५८+२१)  झाली आहे. आज दिवसभरात ४८ रुग्ण बरे झाले.  तर दोन जणांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता २७३ जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १४३६८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३९०६, फेरतपासणीचे १५८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३०४ नमुने होते. आजपर्यंत एकूण १४२५८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १२४०० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८७९ (१८५८+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आज २० पॉझिटिव्ह

आज दिवसभरात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आज सकाळी प्राप्त अहवालात २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून दोन जण महान, दोन जण बाळापूर, तर उर्वरित सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.तर सायंकाळी अहवाल प्राप्त झाले नाही,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.

४८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, कोविड केअर सेंटर मधून ३०, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच, ओझोन हॉस्पिटल मधून चार व हॉटेल रिजेन्सी येथून पाच अशा ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले अकोट,पातूर, जीएमसीआणि मलकापूर येथील रहिवासी आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झालेल्यात १४ जण हे पातूर येथील, नऊ जण बाळापूर येथील, तीन जण डाबकी रोड येथील, तर उर्वरित तेल्हारा, अकोट, मोठी उमरी व अकोट फ़ैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर मधून प्राप्त झाली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली. तर अकोट येथील ६० वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि.२५जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

२७३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १८७९ (१८५८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९४ जण (एक आत्महत्या व ९३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५१२ आहे. तर सद्यस्थितीत २७३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ