बॅकांनी पिक विमा प्रकरणे 31 जुलैपूर्वी पूर्ण करावी





        अकोला,दि.28(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा केले जात आहेत.  तथापि बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारत नसल्यामुळे शेतकरी/लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचेही पिक विमा अर्ज व हप्ते स्विकारणे बॅंकांना बंधनकारक असून बॅंकांनी हे अर्ज स्विकारावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले.  तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्याची मुदत 31 जुलै 2020 असून  शेतकऱ्यांनी आपल्या बॅंकेत हे अर्ज व हप्त्याची रक्कम जमा करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.
            आज नियोजन भवनात बँक अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक निकम, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक वाळके, सहकारी संस्थेचे उपनिबंधक श्रीकांत खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            आतापर्यंत 1 लाख 42 हजार 500 प्रकरणापैकी 79 हजार 838 खरीप पिक विमा प्रकरणे झाली असून उर्वरित प्रकरणे 31 जुलै पूर्वी पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत 85 हजार 112 शेतकऱ्यांपैकी 46 हजार 621 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्त करण्यात येईल.
जिल्हा उद्योग केन्द्राच्या पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेअंतर्गंत  जिल्ह्यातील उद्योगाला चालणा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपले गाव, आपले उत्पादन  व आपले मार्कट या दृष्टिकोणातून छोटेछोटे उद्योग ग्रामीण भागात सुरु करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे व प्रशिक्षण पूर्ण झाल्याना त्यांचे प्रकरणे पूर्ण करुन बँकेकडे सिफारस करण्यासाठी प्रस्तावित केले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केन्द्राचे व्यवस्थापक निकम यांनी दिली.  हातमाग, मधमाशा पालन, अगरबत्ती, गॉरमेंट उद्योग, दुग्ध प्रक्रीया उद्योग, सोलरवरील चरखाव्दारे सूत काढणे, खराटा व झाडू उद्योग आदि प्रकरणाचा समावेश असून बँकेव्दारे या प्रकारणाचा कर्ज देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी व हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
प्रधानमंत्री पिक विमा योजनाबाबत अडचणी असल्यास शेतकऱ्यांसाठी संपर्क क्रमांक
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा कंपनी म्हणून एचडिएफसी इरगो इन्सूरन्स या विमा कंपणीला तीन वर्षासाठी नियुक्त केले आहे. या कंपणीचे संपर्क अधिकारी प्रत्येक तालुक्यात नेमले असून त्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. संजय निपाणे, जिल्हा व्यवस्थापक संपर्क क्रमांक 7057502870, महादेव जगताप अकोट ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 9423486699, अभिषेक रानडे, बाळापूर ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 8237461040, नरेन्द्र बाहकर बार्शिटाकळी ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9766558561, शुभम हरणे, मुर्तिजापूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 8975883826, धिरज कोहार, पातूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9552624966, प्रफुल मानकर, तेल्हारा ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9689761512 असे आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा अर्ज व हप्ता भरण्यात अडचण येता कामा नये,याची दक्षता घेण्यात यावी, से जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ