कावड यात्रा व बकरी ईद या उत्सवासाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा




अकोला,दि.23(जिमाका)-  श्रावण महिन्यात सोमवारी निघणाऱ्या कावड यात्रा तसेच मुस्लिम बांधवाच्या बकरी ईद या उत्सवाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था दृष्टीने  नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर समवेत आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी(शहर)सचिन कदम, पोलिस वाहतुक निरिक्षक गजानन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याबाबत निर्णय झाला असून शिवभक्तांनी एक मानाची पालखी काढण्याचे ठरले आहे. त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
सध्याचे  कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता मुस्लिम बांधवानी बकरी ईद अत्यंत साधा पध्दतीने व घरगुती स्वरुपात साजरी करावी, कुठेही अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशान्वये सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते  दैनंदिन पुजा व प्रार्थना सुरु असतात. हे संकट हे संसर्गजन्य आजाराचे संकट असल्याने आणि माणसे एकत्र आल्यानेच हा आजार पसरत असल्याने कुणालाही सवलत देता येणार नाही. त्यामुळे कोणताही प्रकारचा संसर्गाचा फैलाव होऊ न देणे  हे प्रशासनासह साऱ्यांचेही आद्यकर्तव्य आहे. यासाठी  शिवभक्तांनी आपापल्या घरीच पिंडीवर जलाभिषेक करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारची पायी मिरवणूक काढता येणार नाही. वाहनाव्दारे प्रशासनाने कोविडसाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन करुनच उत्सव साजरा करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ