पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.२५(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि. २७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि. २७ रोजी सकाळी १० वा. ५५ मि. नी आनंद आश्रम, उमरी येथे आगमनसकाळी ११ वा. आनंद आश्रम, उमरी ता.जि. अकोला येथील अनाथ मुलींना गणवेश वाटप.  सकाळी पावणे बारा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व दुपारी १२ वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व बैठकीत उपस्थिती.  दुपारी तीन वाजेपर्यंत विभागीय आयुक्त, अमरावती विभाग अमरावती यांचे उपस्थितीत शासकीय अधिकारी यांचे समवेत खालील विषयावर आढावा बैठक.
१.      अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प (पाटबंधारे व जलसंपदा) समस्या व सद्यस्थितीबाबत आढावा (जि.प./राज्य शासन)
२.      प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत आढावा
३.      समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व त्या अनुषंगाने सद्यस्थितीबाबत आढावा (जि.प./राज्य शासन) –शाळाबाह्य अनाथ, अपंग निराधार, आदिवासी वाडे/वस्ती व पारधी बेडे, इतर.
४.    कामगार विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामगारांच्या समस्या व विभागाअंतर्गत राबविण्यात येणारे विषयांचा आढावा.
५.     सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत राबविण्यात येणारे विविध रस्ते प्रकल्प व उड्डाण-पुलाबाबत आढावा.
६.      जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत आढावा.
दुपारी तीन वा. शासकीय विश्रागृह, अकोलाकडे प्रयाण व दुपारी ३ वा ५० मि. पर्यंत राखीव. दुपारी चार वा. शगुन मंगल कार्यालय, जठार पेठ, अकोला येथे मुख्यमंत्री श्री.द्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कोविड-देवदूत  या अकोला जिल्ह्यातील कोविड काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व सेवक यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती व सवडीने कुरळपूर्णा, जि. अमरावती कडे प्रयाण. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ