जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मेडिकल टास्कफोर्सचा आढावा


अकोला,दि.४(जिमाका)- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजही चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने मेडीकल टास्क फोर्सची बैठक बोलावली. या बैठकीत मृत्यूदर रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडलेल्या या बैठकीस अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. रामधन पांडे, डॉ. सौरभ कोराने, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. राजन पिंगळे,  डॉ. मधुरा काटदरे, डॉ. पियुष गुप्ता यांची उपस्थिति होती.  यावेळी जिल्ह्यात बाधितांच्या होत असलेल्या मृत्यू बाबत गंभीर चिंता व्यक्त करुन प्रत्येक मृत्यूचे वैद्यकीय कारण जाणुन घेण्यात आले.  प्रत्येक रुग्णाच्या विविध चाचण्या व संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या औषधे, प्रतिजैविके यांची माहितीही देण्यात आली. वैद्यकीय उपचारांसंदर्भात आयसीएमआर कडून आलेल्या  मार्गदर्शक सुचनांचीही माहिती देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड वार्डात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच वार्डातील स्वच्छता व अन्य आवश्यक कामांसाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी रोजंदारीवर नियुक्त्या कराव्या असा निर्णयही घेण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना