२८९ अहवाल प्राप्तः ३९ पॉझिटीव्ह, ३५ डिस्चार्ज, तीन मयत


अकोला,दि.२(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  २८९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५० अहवाल निगेटीव्ह तर ३९ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १६०७  झाली आहे. आज दिवसभरात ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर तीन जणांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११५४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १११८५, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२० नमुने होते. आजपर्यंत एकूण ११४५३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९८४६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६०७ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात  ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दहा महिला असून अन्य नऊ पुरुष आहेत. त्यातले दोन जण तेल्हारा येथील,दोन जण खदान,दोन जण गुळजारपुरा, दोन जण हरिहर पेठ,दोन जण अकोट फ़ैल येथील तर उर्वरित वाशीम रोड,गाडेगाव,खैर मोहम्मद प्लॉट, मलकापूर जि. बुलडाणा, हातरून, आळशी प्लॉट, काला मारोती, अकोट व हामजा प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी २० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील चार जण गंगानगर येथील, तीन जण सिंधी कॅम्प येथील, तीन जण बाळापूर येथील,  दोन जण गजानन नगर येथील, दोन जण अकोट येथील तर उर्वरीत हरिहरपेठ, पातूर, घुसर, हातरुन, तारफैल व आदर्श कॉलनी  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
घुसर येथील रुग्ण विदेशातून आलेला
यातील घुसर येथील रुग्ण हा किर्गिझिस्थान येथून आलेला असून तो गावी न जाता त्याला कोविड केअर सेंटरलाचा क्वारंटाईन करुन निरीक्षणात ठेवले होते. तेथे चाचणी झाल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान सद्यस्थितीत आढळून येणारे पॉझिटीव्ह रुग्ण हे सुरु असलेल्या संपर्क चाचण्यांमधून तसेच जोखमीच्या व्यक्तींच्या होत असलेल्या चाचण्यांमधून येत आहेत,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  १०  तर कोविड केअर सेंटर मधून    २५ अशा ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आलेल्या १० जणांपैकी  सिंधी कॅम्प येथील तीन, वाडेगाव बाळापूर येथील दोन,  अकोट फैल येथील दोन ,तर जीएमसी अकोला, आदर्श कॉलनी, रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. तर २५ जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात पाच जण हरिहरपेठ येथील , तीन जण बार्शी टाकळी येथील, तीन जण आदर्श कॉलनी येथील, तारफैल येथील तीन जण तर सिद्धार्थ नगर येथील दोन जण, रामदास पेठ येथील दोन जण,  तर खदान, गंगानगर, देशमुख फैल, दगडी पुल,  गाडगे नगर, जुना तारफैल, जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.
तीन मयत
आज दिवसभरात तीन जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला. काल (दि.१ जुलै) रात्री उपचार घेतांना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला दि.२९ जून रोजी दाखल झाली होती. तिचा काल मृत्यू झाला. तिचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. दरम्यान आज दुपारनंतर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव जामोद जि. बुलडाणा येथील एका ४५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. ही महिला दि.२१ जून रोजी दाखल झाली होती. तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तर अन्य एक ७१ वर्षीय पुरुष रुग्ण असून हा रुग्ण अकोट येथील रहिवासी आहे. हा रुग्णही दि.२२ जून रोजी दाखल झाला होता. तर त्याचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १६०७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८३ जण (एक आत्महत्या व ८२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२०० आहे. तर सद्यस्थितीत ३२४  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना