क्षेत्रिय प्रचार कार्यालयातर्फे जिल्ह्यात १३, १४ ला महामतदार जागृती


        अकोला,दि.१० (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी  मतदार जनजागृतीसाठी रविवार दि.१३ व सोमवार दि.१४ रोजी  ‘महा मतदार जागृती’ अभियान राबविण्यात येणार आहे.  अमरावती येथील क्षेत्रीय  लोक संपर्क ब्युरोच्या वतीने  हे अभियान दोन दिवस राबविण्यात येणार आहे. मुर्तिजापूर आणि अकोला विधानसभा मतदार संघ क्षेत्रात विविध भागात व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाचे उद्घाटन  सोमवार दि.१४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.  या अभियानात चित्ररथ, कलापथक, ऑडीओ व व्हिडीओ माध्यमातून  मतदारांपर्यंत मतदार जागृतीविषयक संदेश पोहोचविले जाणार आहेत, असे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ