राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी व्हा ;जिल्हा प्रशासनाचे आवाहन गुरुवार दि.31 रोजी आयोजन



अकोला, दि.30 (जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने  जिल्हा प्रशासन , जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्या वतीने  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये अकोला शहर व जिल्ह्यातील  अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय  व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी , युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
            आज दि.30 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या उपस्थितीत विविध संघटनेचे पदाधिकारी , शारीरीक शिक्षण शिक्षक, क्रीडा शिक्षक , स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकाचे शिक्षक आदींची बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा क्रीडा अधिकारी  अनिल  बिडवे,  उपशिक्षणाधिकारी  दिनेश सरोळे, स्काऊट गाईडचे जिल्हा समन्वयक बालाजी सानप , क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी , चारूदत्ता नाकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
 राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो यानिमीत्य 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते.
यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम  येथून गुरुवार, दि.31 रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.या दौडीचा मार्ग वसंत देसाई स्टेडियमचे जिम प्रवेश व्दार – दिपक चौक (संतोषी माता चौक) – अग्रसेन चौक-  दुर्गाचौक-  भांबुरकर हॉस्पीटल- जिल्हा न्यायालय रोड-  वसंत देसाई स्टेडियमच्या बँडमिंटन हॉल कडील प्रवेश व्दार येथे समारोप होईल. या दौडमध्ये सुमारे 400 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहे. तरी  सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी ७ वाजेपर्यन्त वसंत देसाई स्टेडियम अकोला  येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ