निवडणूक पूर्वतयारी वेगात; निरीक्षकांनी घेतला आढावा


                 अकोला,दि.९ (जिमाका)- जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ क्षेत्रात सुरु असलेल्या निवडणूक पूर्वतयारीने आता वेग घेतला असून या पुर्वतयारीचा  आढावा भारत निवडणूक आयोगामार्फत जिल्ह्यात दाखल झालेल्या निवडणूक निरीक्षकांनी आज घेतला. आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवडणूक निरीक्षक सामान्य- केशव हिंगोनिया (विधानसभा मतदारसंघ ३०- अकोला पश्चिम, ३१- अकोला पूर्व, ३२- मूर्तिजापूर),निवडणूक निरीक्षक सामान्य- हंसराज चव्हाण ( विधानसभा मतदार संघ  २८ –अकोट, २९ बाळापूर.) निवडणूक खर्च  निरीक्षक - संदीप लाकरा (विधानसभा मतदार संघ २८ –अकोट, २९ बाळापूर, ३० अकोला पश्चिम.) निवडणूक खर्च निरीक्षक-  आशुतोष कुमार (विधानसभा मतदार संघ ३१- अकोला पूर्व, ३२- मुर्तिजापूर.) निवडणूक निरीक्षक कायदा व सुव्यवस्था- ललित दास (विधानसभा मतदार संघ  २८-अकोट, २९- बाळापुर, ३०- अकोला पश्चिम, ३१- अकोला पूर्व, ३२- मुर्तिजापूर) हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी खंडागळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.  प्रवीण लोखंडे, निवडणूक निर्णय अधिकारी रामदास सिद्धभट्टी (२८-अकोट), रमेश पवार (२९- बाळापूर), गजानन सुरंजे (३०- अकोला पश्चिम), निलेश अपार (३१-अकोला पूर्व),  अभयसिंग मोहिते  (३२- मुर्तिजापूर), तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय सर्व नोडल अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेला उमेदवारी अर्ज माघारीनंतर वेग आला आहे. त्यानुसार उमेदवार संख्येनुसार मतदान यंत्र उपलब्धता, त्यानुसार यादृच्छिकरण व अन्य बाबींची पूर्तता याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.  सर्व निरीक्षकांनी मतदार संघ निहाय मतदार संख्या, उमेदवार संख्या, मतदान केंद्र संख्या त्यानुसार उपलब्ध मतदान यंत्रे व अन्य अनुषंगिक सामुग्री व साहित्य. तसेच  उपलब्ध मनुष्यबळ, वाहतुक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था आदींबाबत आढावा घेतला.  याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी माहिती दिली.  यासोबतच मतदान केंद्रांवर द्यावयाच्या किमान आवश्यक सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा, मतदारांना द्यावयाच्या वोटर्स स्लिप याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक मतदारसंघनिहाय आचारसंहिता उल्लंघन प्रकरणे इ. बाबतही  आढावा घेण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ