नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


            अकोला, दि.19 (जिमाका)- भारतीय मौसम विभाग ,नागपुर यांच्या संदेशानुसार ‍दि. 20 ऑक्टोबर दरम्यान  विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होणे अशी शक्यता वर्तविली आहे.  मुर्तिजापुर तालुक्यातील पुर्णा नदीवर असलेले घुंगशी बॅरेज 87% भरले असुन अतिरीक्त पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये करण्यात येत आहे.  तसेच पुर्णा नदीवर असलेले नेर धामना  बॅरेज  जलसंचय  पातळी वाढविण्याचे काम सुरू असुन  पुर्णा नदी  पाणी पातळी वाढणार आहे.नदी, नाला काठावरील गावांना  सतर्कतेचा  इशारा देण्यात येत आहे. तसेच क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात येते असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ