जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांत पाच नवीन खेळांचा समावेश


             अकोला,दि.११(जिमाका)-  जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.त्यात मिनी गोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट व स्पीड बॉल या खेळांचा समावेश आहे.  या खेळांच्या स्पर्धांचे आता जिल्हास्तरावर आयोजन करावयाचे असल्याने संबंधित खेळांच्या संघटनांनी  अधिकृत मान्यता प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे पाठवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम