नवदुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिनी रहदारीत बदल



अकोला, दि.05 (जिमाका)-  नवदुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक व सभामुळे  वाहतुकीचा व्यत्यय होऊ नये यासाठी  अकोला- अकोट मार्ग व पारस फाटा – बाळापूर -  मार्ग व अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
बुधवार  दि.9 च्या सकाळी 6 वाजेपासून ते गुरूवार  दि.10 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील , अकोला पारस फाटा ते बाळापुर मार्गावरील व अकोला- अकोट मार्गावरील रहदारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
करण्यात आलेले बदल याप्रमाणे-
अकोला-अकोट राज्य महामार्गावरील वाहतुक
अकोला बसस्थानक   रेल्वेस्टेशन चौक , आपातापा चौक- गांधीग्राम मार्गे अकोट कडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोला कडे याच मार्गाने येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अकोला बसस्थानक-, पोस्ट ऑफीस चौक – सिव्हील लाईन चौक– नेहरू पार्क – हुतात्मा चौक- भगतसिंग चौक- वाशिम बायपास- शेगाव टी पॉईंट- गायगाव- निंबा फाटा- देवरी फाटा- अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला पारस फाटा- बाळापूर  महामार्गावरील वाहतुक
अकोला बसस्थानक पारस फाटा- बाळापुरकडे तसेच बाळापूर ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी वाहतूक  अकोला -  पारस फाटा – हायवे टॅप कार्यालय कडुन बाळापूर कडे जाणारी व येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल. तसेच खामगांव – पारस फाटा- बाळापूर- पातुरकडे जाणारी व येणारी वाहतुक खामगांव – पारस फाटा- अकोला (वाशिम बायपास चौक) – पातुरकडे जाणारी तसेच पातुरकडून बाळापूरकडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
अकोला शहरातील मार्गावरील रहदारीत बदल
रेल्वेस्टेशन चौक ते रेल्वे ब्रीज-  अकोट स्टँड ते  बियाणी चौक- कोतवाली चौक- गांधी चौक- धिंग्रा चौक्‍ या मार्गाने जाणारी वाहतुक रेल्वे स्टेशन – अग्रेसन चौक- दुर्गा चौक्‍- रतनलाल प्लॉट चौक्‍- सिव्हील लाईन चौक- नेहरूपार्क या मार्गाने वळविण्यात आली आहे.
अशोक वाटीक चौक ते धिंग्रा चौक – टावर चौक- रेल्वेस्टेशन चौक  या मार्गाची वाहतुक  अशोक वाटीका - नेहरू पार्क चौक – सिव्हील लाईन चौक – रतनलाल प्लॉट चौक- दुर्गा चौक- बांभुरकर हॉस्पीटल  चौक- रेल्वेस्टेशन चौक या मार्गाने वळविण्यात आली  आहे.
000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ