विधानसभा निवडणूक २०१९ : पाच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; ५७ जणांना अटक


                     अकोला,दि.४ (जिमाका)-  जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्री विरोधात  धडक मोहिम सुरु केली असून दि. २१ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या या मोहिमेत दि.३ ऑक्टोबर अखेर पर्यंत पाच लाख २ हजार १६ रुपये किमतीचा दारुसाठा जप्त करुन ५७ जणांना अटक केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर ही कारवाई करण्यात आली आहे.
                        सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा  निवडणूक -२०१९ चे अनुषंगाने अवैधदारू  विक्रीवर  आळा घालण्यासाठी   राज्य उत्पादन  शुल्क ,अकोला  विभागाकडून  विशेष मोहिम  राबविण्यात येत आहे.  अवैध  दारू  तयार होणाऱ्या  क्षेत्रांची व विक्री ठिकाणाची यादी तयार  केली असुन  याठिकाणी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.  अवैध  दारूविक्री करणाऱ्या  ठिकाणी धाड सत्र  सुरू  करण्यात आले आहे.  यासाठी पोलिस विभागाचीही मदत  घेण्यात  येत आहे.  आचारसंहिता लागल्यापासुन   आतापर्यंत  साधारण  67 ठिकाणी  राज्य उत्पादन  शुल्‌क  , अकोला विभागाकडुन  गुन्हे नोंदविले असुन मोठ्या प्रमाणात ढाबे तसेच हॉटेलची गुन्हा  अन्वेषणकामी तपासणी केली  जात आहे.    रात्रीच्या  वेळी गस्त  घेण्यात येत आहे.  जिल्ह्यामध्ये सराईत   आरोपींकडुन   चांगली वर्तणूक  ठेवण्यासाठी  प्रतिभूती  मागण्याकरीता  उपविभागीय  दंडाधिकारी यांचेकडे  कलम ९३ अंतर्गत १२ प्रस्ताव सादर केले आहे.  या कालावधीत एकुण  ६७ गुन्ह्यापैकी वारस ५७ व बेवारस  १० गुन्हे नोंदविले असुन ५७  आरोपींना  अटक  केली आहे. यामध्ये ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
                      निवडणूकीच्या पुढील काळात याप्रकरणी मोठ्या   प्रमाणात  कारवाई करण्यात येणार असून,जिल्ह्यात  अवैध दारू विक्रीवर प्रतिबंद  घालण्याकरीता   राज्य उत्पादन    शुल्क, अकोला विभागाकडुन तीन  विशेष पथके तयार केली आहेत.  निवडणूक  काळात  अवैध  दारूविक्री होणार नाही यासाठी विशेष  उपाययोजना  करण्यात  आल्या आहे. अवैध मद्यविक्री  रोखण्यासाठी  परवानाधारक  अनुज्ञप्तीचे ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कारवाई  राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक  स्नेहा  सराफ यांचे  मार्गदर्शनाखाली,  निरीक्षक  जी.एम.  शिरसाम, ए.जी. काळे, डि.के. क्षिरसागर, उपनिरीक्षक बापु बोढारे,  दिवाकर वाघ, संजय देशमुख, डि.ओ.  कुटेमाटे, बी.आर.  पगारे,  सतीश  पाटील,  सौ. नयना देशमुख , ज्योती गुट्टे  ,आयशा  लांबट  आदी  कर्मचारी  करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ