नोंदणी व मुद्रांक विभागाचे नागरी सेवासुधारणा अभियान


        अकोला,दि.18 (जिमाका)-   अकोला शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने आपल्याकडील कामकाज सुलभ व  सोपे करण्यासाठी नागरीकांना उपलब्ध  करुन दिलेल्या विविध  इंटरनेट सेवांचे  मंगळवार दि. 15  नोंदणी व मुद्रांक  कार्यालयात सादरीकरण  करण्यात आले. नोंदणी   महानिरीक्षक अनिल कवडे महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देशानुसार  याबाबतचे विशेष ‍ अभियान  सुरू करण्यात आले आहे. विभागाकडील  दस्तऐवजांचा शोध घेणे ,  मुल्यांकन, डाटाएन्ट्री  , टोकन बुकींग ,   मालमत्तांचे  दर, मुद्रांक   शुल्कासह सर्वच रकमांचे प्रदान ईंटरनेटव्दारे करणे इत्यादी सेवांबाबतची सविस्तर   माहिती पॉवर पॉईंट    सादरीकरणाव्दारे  या विभागातील   धनंजय  देशपांडे यांनी  उपस्थितांना दिली.  यावेळी  उपमहानिरीक्षक मोहन जोशी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. तसेच सह जिल्हा निबंधक डी. एस.  भोसले, जिल्हा निबंधक  के.ए. मगर यांनी   या सेवांचा नागरिकांनी   लाभ घेण्याचे  आवाहन केले.  या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी  व्ही. पी. जाधव, तसेच  अन्य  अधिकारी तथा कर्मचारी उपस्थीत  होते. ए.एस. मेश्राम यांनी मान्य वरांचे  स्वागत केले तर एन.जी. यंबडवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.  या कार्यक्रमास शहरातील विधीज्ञ, बांधकाम व्यवसायी  बँक अधिकारी , दस्तऐवज लेखक व मुद्रांक विक्रेते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम