निवडणुक कालावधीत खोदकाम करण्याआधी दुरसंचार अभियंत्यांचे ना-हरकत आवश्यक


                                               
अकोला,दि.14(जिमाका)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर सर्व ऑनलाईन प्रणालीवरुन करावयाची निवडणुकीची कामे अव्याहतपणे करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी दुरसंचार सेवा अव्याहत सुरु राहण्यासाठी 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला पश्चिम, 31-अकोला पुर्व, 32-मुर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात कलम 144 अन्वये खोदकामास मनाई करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणी प्रकिया पुर्ण होईपर्यंत शहरातील अति महत्वाचे नेटवर्क असलेले कापड बाजार  चौक ते लक्झरी बस स्टॅन्ड, सरकारी बगीचा ते अशोक वाटीका, दक्षता नगर चौक ते सरकारी गोडावुन, रेल्वे स्टेशन ते अशोक वाटीका या मार्गांवर कोणतेही नवीन खोदकाम करावयाचे असल्यास विभागीय अभियंता, भारत संचार निगम लि. सिव्हील लाईन अकोला (9422160003) यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही खेदकामास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ