स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान


             अकोला,दि.१४(जिमाका)-  विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक वा त्यापेक्षा वरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये  स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावे यासाठी  सोमवार दि.१४ ते रविवार दि.२७ ऑक्टोबर या कालावधीसाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी आज निर्गमित केले. या आदेशान्वये पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर  रस्त्यावरुन जाणाऱ्या जमावाची वर्तणूक , अडथळा निर्माण होऊ न देणे,  मिरवणूका आदींचे मार्ग निश्चित करणे,  गर्दीच्या जागी बंदोबस्त करुन सुव्यवस्था राखणे,  वाद्यवाजविणे,  धवनिक्षेपकाच्या वापराबाबतचे नियमन करणे यासाठीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, असे या आदेशात म्हटले आहेत.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ