विधानसभा निवडणूक- 2019 नोडल अधिकारी अनिल खंडागळे यांनी घेतला खर्च विषयक आढावा



अकोला,दि.5 (जिमाका)-  निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात खर्च विषयक बाबींचे नोडल अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आज (दि.5) खर्च विषयक बाबींचा आढावा घेतला. 
यावेळी 28 अकोट, 29 बाळापुर,30 अकोला पश्चिम, 31- अकोला पुर्व, 32- मुर्तिजापुर या विधानसभा  मतदार  संघातील जिल्हास्तरीय  खर्च विषयक पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी  मार्गदर्शनपर सुचना  केल्या. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या खर्चाबाबतचा अहवाल खर्च पथकास सादर करावा, खर्चावर  नियंत्रक ठेवण्याबाबत व मर्यादेपेक्षा  जास्त खर्च  निदर्शनास आल्यास  निवडणूक आयोगाचे सुचनांनुसार  योग्य कार्यवाही करण्याचे  निर्देश त्यांनी दिले. विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या स्तरावर काम करणा-या खर्च विषयक अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर नियंत्रण ठेवावे. त्यांना मार्गदर्शक सुचना कराव्यात त्याच्या अडीअडचणी  व समस्या  सोडविण्यासाठी जिल्हासतरीय खर्च विषयक समितीने  वेळोवेळी सहकार्य करावे अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यात.याकामी कोणत्याही  पथकातील  अधिकारी कर्मचारी यांनी टाळाटाळ अथवा हयगय केल्यास त्यांचे विरूद्ध  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस मुख्य लेखा वित्त अधिकारी  एस.बी. सोनी , जिल्हा कोषागार अधिकारी एम.बी. झुंजारे, लेखा अधिकारी शरद घरडे, कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ