शिवतेज प्रतिष्ठानाच्या योग साधकांची मतदानाची प्रतिज्ञा




अकोला,दि.6 (जिमाका)- शिवतेज प्रतिष्ठान अकोलाचे वतीने निशुल्क योगवर्ग वर्षभर मागील १४ वर्षा पासुन सुरू आहे. 21 ऑक्टो.रोजी होउ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करावे .नागरिकात मतदानाची जागृती व्हावी याकरीता आज  गिताई भवन येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांचे मार्गदर्शनात योगगुरू मनोहरराव इंगळे यांनी योग साधक व साधीका यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा केली.
            मी कुठल्याही  आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करेल व नागरीकांना मतदान करण्याचे  आवाहन करेन अशी अशी प्रतिज्ञा म्हटली.   या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे  उपशिक्षणाधिकारी तथा मतदान जागृती  नोडल अधिकारी  ,  प्रकाश अंधारे हे प्रामुख्याने उपस्थित होते व त्यांचे उपस्थितीत शपथ कार्यक्रम पार पडला. या  प्रमोद बंसल, संतोष मसने, जसवंतसिंग मल्ली,बी.यु.इंगळे,ॲड. वामनराव चौधरी,गजानन इंगळे,प्रा.डॅा.सत्यनारायण बाहेती,घनःश्याम गांधी,मुकेश खंडेलवाल,,तसेच अनुराधा इंगळे,वैशाली रावणकर,सोनाली तेलगोटे.सिमा राठी,स्मिता भांडे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवतेज इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले...
                                                             00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ