निरीक्षकांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

अकोला,दि.4 (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरिक्षक  दाखल झाले.  त्यांनी आज जिल्हास्तरीय  निवडणूक यंत्रणेची  बैठक  घेऊन  निवडणूक पुर्व तयारीचा आढावा  घेतला.
अकोला जिल्हयातील 28- अकोट, 29 – बाळापुर या दोन विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक हंसराज चव्हाण तसेच  28- अकोट, 29 – बाळापुर, 30-  अकोला (पश्चिम) , 31-  अकोला (पुर्व) , 32-  मुर्तिजापुर या  विधानसभा मतदार संघाचे  कायदा व सुव्यवस्थेचे  निरीक्षक ललीत दास  यांनी जिल्ह्यात दाखल होताच  निवडणूक  पुर्वतयारीचा आढावा  घेतला.
जिल्हाधिकारी  कार्यालयात  आयोजीत बैठकीस जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक  अधिकारी  जितेंद्र  पापळकर , जिल्हा पोलीस अधिक्षक  अमोघ गांवकर ,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  उपजिल्हा निवडणुक अधिकारी  राजेश खवले,  राज्य  उत्पादन शुल्क  विभागाच्या अधिक्षक  स्नेहा  सराफ तसेच अन्य  अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दाखल झालेल्या दोन्ही  निरीक्षकांचे   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वागत केले. उपस्थित निरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील  निवडणूक पुर्व   तयारीचा आढावा  घेतला. तसेच दिव्यांग मतदारांसाठी  उपलब्ध करण्यात  आलेल्या  सुविधांचा  आढावा  घेला.  तसेच   मतदार  संघावर  उपलब्ध  करावयाच्या  आवश्यक सुविधांच्या  उपलब्धेबाबत माहिती देण्यात आली.  पोलीस अधिक्षक गावकर  यांनी  कायदा  व सुव्यवस्थेची  माहिती दिली. 
मिडीया सेंटरची पाहणी
बैठकीनंतर निरीक्षक हंसराज चव्हाण यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन तेथील  कामकाजाची पाहणी केली.  यावेळी त्यांना नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी मिडीया सेंटर कामकाज व माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समितीच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर हे ही उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ