खरीप पिकाची नजर अंदाज पैसेवारी जाहिर


                                  
अकोला,दि.01 (जिमाका)-  खरीप पिकांच्या संदर्भात सन 2019-20 या वर्षाकरीता  तहसिलदार  यांच्याकडुन प्राप्त झालेल्या  (हंगामी) नजर अंदाज पैसेवारीच्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील एकुण 1012  गावांपैकी  990 गावांची  पैसेवारी  काढण्यात आली असुन त्यापैकी 990 गावांची पैसेवारी  50 पैसा पेक्षा जास्त आहे.  हि नजर अंदाज पैसेवारी  70 पैसे इतकी आहे,  असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
अकोला तालुक्यातील 199 गावांपैकी  181 गावांची , अकोट तालुक्यातील 185 गावांपैकी  185 गावांची, तेल्हारा तालुक्यातील 106 गावांपैकी  106 गावांची, बाळापुर तालुक्यातील 103 गावांपैकी  103 गावांची, पातुर तालुक्यातील 95 गावांपैकी  94 गावांची, मुर्तिजापुर तालुक्यातील 164 गावांपैकी  164 गावांची तर बार्शिटाकळी तालुक्यातील 160 गावांपैकी  157 गावांची नजर अंदाज पैसेवारी 50 पेक्षा जास्त आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ