विधानसभा निवडणूक- 2019: ३०- अकोला पश्चिमचे निवडणूक निरीक्षक भेटणार सामान्य मतदारांना


अकोला,दि.(जिमाका)-  विधानसभा निवडणूक २०१९ साठी ३०-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघांकरीता नियुक्त केलेले निरीक्षक  केशव हिंगोलिया दाखल झाले असून ते सकाळी ११ ते १२ या वेळात  मतदारांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, असे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किशोर गावंडे यांनी कळविले आहे.
 केशव हिंगोलिया यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९१७२६११३५२ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३७८९९४१४९ असा आहे. निवडणूक निरीक्षक हिंगोलिया हे गुरुवार दि. २४ तारखेपर्यंत  शासकीय विश्रामगृह अकोला येथे उपलब्ध असून सकाळी ११ ते १२ या यावेळात मतदारांना भेटणार आहेत.  ज्यांना आपल्या अडचणी, सुचना करावयाच्या असतील त्यांनी  यावेळात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे निवडणूक निरीक्षक खर्च संदीप लाकरा यांचा भ्रमणध्वनी  ९४३८९१७४३६ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी एस.डब्ल्यू.बोके कार्यकारी अभियंता जलसंधारण यांचा भ्रमणध्वनी  क्रमांक ७५८८५००७१६ असा आहे. खर्च निरीक्षक हे सोमवार दि.२१ पर्यंत उपलब्ध आहेत.
कायदा व सुव्यवस्था निरीक्षक ललीत दास  यांचा भ्रमणध्वनी  ९७६६५१६०३४ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांचा भ्रमणध्वनी  ९४२२८६११११ असा आहे.  ते ही  दि. २१ पर्यंत उपस्थित राहणार असून  सकाळी १० ते ११ यावेळात त्यांना भेटता येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ