मतदान ओळखपत्र नसल्यास ‘या’ कागदपत्रांआधारे देता येतील ओळखीचे पुरावे


अकोला,दि.16 (जिमाका)-   विधानसभा  सार्वत्रिक  निवडणूकीकरीता मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदान ओळख पत्र (EPIC) देण्यात आले आहेत. जे मतदार आपले  मतदान ओळख पत्र दाखवू शकणार नाहीत त्यांच्यासाठी पर्यायी पुरावे म्हणून  खालील 11 प्रकारच्या कागदपत्रांना ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास  निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक कागदपत्र मतदार आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर साद्र करु शकतील,असे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.
ग्राह्य धरण्यात येणारे कागदपत्रे याप्रमाणे-
1)पासपोर्ट,
2)वाहन चालक परवाना,
3)छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र / राज्‍य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र),
4)छायाचित्र असलेले बॅंकेचे  किंवा  पोस्टाचे पासबुक,
5)पॅन कार्ड,  
6)रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया व्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत  निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड,
7)मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड,
8)कामगार मंत्रालया व्‍दारे दिले गेलेले आरोग्‍य विमा स्‍मार्ट कार्ड,
9)छायाचित्र असलेले निवृत्‍तीवेतन कागदपत्रे,
10)खासदार/आमदार/विधान परिषद सदस्‍य यांचे ओळखपत्र ,
11)आधार कार्ड.
 या 11 पुराव्यांना निवडणूक आयोगाने  मान्‍यता दिली असून यापैकी कोणताही पुरावा मतदाराची ओळख पटविण्‍या करिता ग्राह्य धरण्‍यात येईल, याची मतदारांनी नोंद यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ