क्षेत्रिय लोकसंपर्क कार्यालयाचा उपक्रम; ‘महा मतदार जागृती’अभियान जिल्ह्यात सुरु


             अकोला,दि.१४(जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी  मतदार जनजागृतीसाठी ‘महा मतदार जागृती’ अभियान आजपासून अकोला जिल्ह्यात सुरु झाले. अकोला जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक हंसराज चौहान व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा प्रचार रथ आज जिल्ह्यात रवाना झाला.
भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या  अमरावती येथील क्षेत्रीय  लोक संपर्क ब्युरोच्या वतीने  हे अभियान दोन दिवस राबविण्यात येणार आहे. या अभियानास आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, आकाशवाणी अकोला केंद्राचे  कार्यक्रम विभागप्रमुख विजय दळवी,  क्षेत्र प्रचार कार्यालयाचे इंद्रवदन सिंह, अंबादास यादव यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून हा प्रचार रथ मार्गस्थ करण्यात आला. या प्रचार रथात पथनाट्य, गीत संगिताच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून त्यांच्यात मतदानाविषयी जागृती केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी पापळकर यांनी या प्रचाररथातील कलावंतांचे कौतूक करुन त्यांच्या कलेद्वारे मतदारांमध्ये जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त  करुन शुभेच्छा दिल्या.
हा प्रचार रथ तीन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे सादरीकरण करणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ