राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखविली हिरवी झेंडी





अकोला, दि.31 (जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने  जिल्हा प्रशासन,  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्या वतीने  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय एकता दौडला शहरातील नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, यानिमीत्य 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णमुरारी शर्मा सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दौडचा शुभारंभ जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम  येथून मार्गक्रमण करीत वसंत देसाई स्टेडियम येथून  अग्रसेन चौक,  दुर्गाचौक,  भांबुरकर हॉस्पीटल, जिल्हा न्यायालय रोड-  वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप राष्टगीताने करण्यात आला. या दौडमध्ये अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय  व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी , युवक-युवती, खेळाडू, नागरिक सहभागी झाले.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले.तर सुत्रसंचालन उपशिक्षणाधीकारी प्रकाश अंधारे यांनी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ