मतमोजणीच्या दिवशी अकोट शहरातील वाहतुकीत बदल



अकोला, दि.19 (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी  गुरुवार दि.24 रोजी मतमोजणी  अकोट- पोपटखेड मार्गावरील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्र अकोट येथील ट्रायसेम हॉलमध्ये   होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता. वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
गुरुवार दि.24 रोजी सकाळी सहा वा. पासून ते  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत पावेतो अकोट -पोपटखेड मार्गावरील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
शिवापुर, बोर्डी , रामापूर, सुकळी, पोपटखेड कडील जाणारी वाहने ग्रामीण रूग्णालयाजवळील औरंगाबाद शेत शिवाराकडून जाणा-या जुना बोर्डी रस्त्याच्या किंवा उमरा, बोर्डी शिवपुर  वापर करता येईल..
पोपटखेड , मोहाळा, आंबोडा, अकोलखेड, अकोला जहागीर , अकोट-अंजनगाव रस्त्याचा वापर करता येईल.  शहापूर , मलकापुर, पोपटखेड, रूधाडी, वस्तापूर, रुईखेड, अकोट अंजनगाव रोड या मार्गाचा वापर करता येईल.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ