जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज मागविले


अकोला,दि.15 (जिमाका)-  ग्रामीण भागात युवा कल्याण, सामाजिक व ग्रामीण विकासाकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थांसाठी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व्दारा अकोला जिल्ह्यातील युवा मंडळांना जिल्हा युवा पुरस्कार देण्याची योजना शासनातर्फे राबविली जात आहे.
पुरस्काराकरिता युवा मंडळांची निवड करतांना त्यांनी केवळ एप्रिल २०१८ ते  मार्च २०१९ या कालावधीत केलेल्या कार्याचाच विचार करण्यात येईल. जिल्हास्तरावर निवड झालेली संस्था राज्यस्तरीय पुरस्कार निवडीसाठी  पाठविण्यात येईल व राज्यस्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्थाव राष्ट्रीय स्तरावर निवडीसाठी पात्र राहील.जिल्हास्तरीय पुरस्कार २५ हजार रुपये व प्रमाणपत्र राज्यस्तरीय विजेता संस्थेस एक लाख रुपये व प्रमाणपत्र, राष्ट्रीयस्तरीय विजेता  संस्थेस प्रथम विजेता पाच लाख रुपये, द्वितीय ३ लाख रुपये,तृतीय दोन लाख रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. नेहरू युवा केंद्राशी संलग्न मंडळांना प्राधान्य राहील. पुरस्काराकरिता आवेदन करणाऱ्या युवा मंडळांनी नमुना अर्ज नेहरू युवा केंद्र, वसंत देसाई स्टेडियम, दुसरा माळा, अकोला कार्यालयातून  शुक्रवार  दि. १८ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन प्राप्त करावा. पूर्ण भरलेले आवेदनपत्र, संस्था नोंदणी पत्र, घटना, वार्षिक अहवाल, फोटो, बातमी व अंकेक्षण अन्य आवश्यक कागदपत्रासह बुधवार  दि. ३० पर्यंत  जमा करावे. जिल्ह्यातील युवक मंडळांनी  या  संधीचा लाभ  घ्यावा असे आवाहन युवा समन्वयक  स्नेहल बास्तुकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ