मतदान, मतमोजणीच्या दिवशी शहरातील वाहतुकीत बदल


अकोला, दि.19 (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी मतदान सोमवार दि.21 रोजी होणार आहे. तर गुरुवार दि.24 रोजी मतमोजणी  होणार आहे. मतदान झाल्यानंतर सरकारी गोडावून खदान, अकोला येथे मतपेट्या जमा करणे व नंतर मतमोजणीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता. वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
मतपेट्या जमा करतेवेळी व तसेच मतमोजणीचे वेळी अकोला शहरातून मंगरुळपीरकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहने हे अशोक वाटीका-हुतात्मा चौक-तुकाराम चौक-कौलखेड चौ-मंगरुळपीर रोड तसेच मंगरुळपीर कडून येणारे वाहने मंगळरुळपीर रोड- कौलखेड चौक-तुकाराम चौक-हुतात्मा चौक-अशोक वाटीका चौक या मार्गाने वळविण्यात आले आहे. दि.24  रोजी सकाळी सहा वा. पासून ते  रात्री आठ वा. पावेतो अकोला शहरातून मंगरुळपिर कडे जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
        .क्र.
सध्‍या सुरु असलेला मार्ग
.क्र.
पर्यायी मार्ग
अकोला बस स्टॅड-अशोक वाटीका चौक-जेल रोड-सिंधी कॅम्प- खदान कौलखेड चौक मार्ग बार्शिटाकळी मंगरुळपिर कडे
बस स्टॅन्ड-अशोक वाटीका चौक-नेहरु पार्क चौक-हुतात्मा चौक-इन्कमटॅक्स चौक- गोरक्षण रोड-तुकाराम चौक-कौलखेड चौक मार्ग बार्शिटाकळी मंगरुळपिर कडे
मंगरुळपिर-बार्शिटाकळी-कौलखेड चौक-खदान-सिंधी कॅम्प-जेल चौक-अशोक वाटीका चौक-बस स्टॅन्ड अकोला कडे
मंगरुळपिर-बार्शिटाकळी-कौलखेड चौक-तुकाराम चौक-जूना आरटीओ रोड-राधाकृष्ण टॉकीज समोरुन-महाकाली चौक-नेहरु पार्क चौक-अशोक वाटीका चौक- अकोला बस स्टॅन्ड
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ