वाहनांवर स्टिकर लावून मतदान जनजागृती; उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम


अकोला,दि.15 (जिमाका)-  मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्यासाठी वाहनांवर मतदान करण्याचे आवाहन  असलेले स्टिकर्स चिकटवण्यात आले. खडकी येथील  पोलिस तपासणी नाक्यावर  येणाऱ्या जाणाऱ्या  वाहनांवर असे स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली.   उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांनी स्वत: वाहनांवर  स्टिकर लावुन  वाहन धारकांना विधानसभा निवडणूकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी  त्यांच्या समवेत स्विपचे  नोडल अधिकारी प्रकाश अंधारे , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  गोपाल वरोकार , मोटार वाहन  निरीक्षक समिर ढेंबरे,  प्रशिक्षणार्थी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक  मनोज शेळके , चैताली आपोतीकर, नितीन खरातसह  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे  कर्मचारी उपस्थित होते. 
 यावेळी जिचकार यांनी, मतदान करणे  हे प्रत्येकाचे  राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे आपली लोकशाही  बळकट करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व महत्वांची कामे  बाजुला सारून मतदान करावे असे आवाहन केले. मतदानाची ही जाणीव इतर मतदारांमध्ये  रूजवून अभिवचन पत्र लिहून घेतले.  निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मतदान जागृती मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ