मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद


             अकोला,दि.११(जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाने जाहीर  केलेल्या  विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील  पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवार दि.२१ रोजी मतदान होणार आहे.  तसेच  गुरुवार दि.२४ रोजी मतमोजणी होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व  अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ सी अन्वये मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपुर्वीच्या ४८ तासा व मतमोजणीच्या दिवशी (दि.२४) जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ क्षेत्रात मद्यविक्री  करण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ