जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘हम युवा मतदार है!’ चित्रफितीचे विमोचन




अकोला,दि.(जिमाका)- अकोला  विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होत असून या निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला मजबूत करावे प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘हम युवा मतदार है!’ या चित्रफितीचे विमोचन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते  आज पार पडला.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे संकल्पनेनुसार आणि उपजिल्हाधिकारी राजेश खवले व जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचे मार्गदर्शनात तयार करण्यात आली आहे. दिग्दर्शन आणि चित्रिकरण टी.व्ही. कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.गीत आणि संगीताची संकल्पना संतोष भाकरे पाटील यांची असून गायक आनंद जागीरदार यांनी स्वरसाज चढविला आहे. संकलन विशाल टाले पाटील यांनी केले आहे. ध्वनी जय गुरु यांचे असून आशिष तोमर यांनी हवाई चित्रण केले आहे.
या चित्रफीतीसाठी जिल्हा माहिती अधिकारी  कार्यालयाचे नितीन डोंगरे, स्विपचे नोडल अधिकारी प्रकाश अंधारे आणि संतोष अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. लोकसभा मतदार संघातील युवक युवती महिला पुरुष दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा एकूणच सहभाग असलेली ही चित्रफीत नक्कीच मतदानाच्या जनजागृतीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. चित्रफीतीचे अनावरण प्रसंगी नायब तहसिलदार सतीष काळे यांची प्रमुखउपस्थिती होती.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ