कामगार,व्यापारी,उद्योजक संघटनांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


                 अकोला,दि.९ (जिमाका)- जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील विविध उद्योग व्यवसायातील कामगार  व त्यांच्या कुटूंबियांनी  १०० टक्के मतदान करावे यासाठी सर्व कामगार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या जनजागृतीत  कामगार, व्यापारी, उद्योजक संघटनांनी पुढाकार घ्यावा व येत्या निवडणुकीत  कामगारांनी  शंभर टक्के मतदान करुन राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी  आज येथे केले.
   विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी कामगारांना  मतदान करता यावे, यासाठी आज  जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कामगार  व उद्योजक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, सहाय्यक कामगार आयुक्त आर.डी. गुल्हाने , सहाकरी कामगार अधिकारी जी. आर. नालिंदे,  दुकान निरीक्षक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 निवडणूक प्रक्रियेत  स्थलांतरीत कामगारांचा  आणि असंघटीत कामगारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी काय उपाय योजना करता येईल? यावर या सभेत विचारविनिमय करण्यात आला. कामगार तसेच त्यांच्या कुटूंबियांनी  मतदान करावे यासाठी  विविध कामगार संघटनांनी व्यापक प्रमाणात  जनजागृती करावी, असे सांगुन  जिल्हाधिकारी  पापळकर म्हणाले की,  प्रत्येक कामगार संघटनेने ठराव घेवून आपल्या अधिनस्त असलेल्या कामगारांना  मतदान करण्यासाठी  प्रवृत्त करावे.  पेट्रोल पंप  तसेच  हॉटल व्यवसायिकांनी  मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पाँईट तयार करावे. कामगारांची मतदान जनजागृतीसाठी रॅली काढावी. हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या बिलावर मतदान जनजागृतीसाठी स्टँपिंग  करावे , स्टिकर्स आदी माध्यमातून  मतदान जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी  पापळकर यांनी केले. कामगार आस्थापनांनी  मतदानाच्या दिवशी कामगारांना त्यांच्या मतदानाचा  हक्क बजाता यावा यासाठी भर पगारी सुटी द्यावी, शक्य नसल्यास कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात यावी  जेणेकरुन कामगारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
                  यावेळी अकोला  इंडस्ट्रिज  असोशिएशन, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज , केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट,   इंडियन मेडिकल,  अकोला जिल्हा सर्व खादयपेय विक्रेता , किराणा बाजार, कापड बाजार, दि ग्रेन मर्चन्ट,  होलसेल ॲन्ड रेडिमेट कापड, डिझेल व पेट्रोल पंप , सराफा असोशिएशन व क्रेडाई चे पदाधिकारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ