अकोला मुर्तिजापूर मार्गावरील रहदारीत बुधवारी बदल



अकोला,दि.14(जिमाका)-  येत्या बुधवारी दि.16 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील स्टेडीयमवर होणार आहे. त्या काळात मुर्तिजापूर, अमरावतीकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार सभा काळात होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता. बुधवार दि.16 रोजी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अकोला ते नेहरु पार्क, तसेच पीकेव्ही मार्गे मुर्तिजापूर कडे जाणारी वाहतुक अकोला बसस्थानक-नेहरु पार्क-हुतात्मा चौक-इन्कमटॅक्स चौक-तुकाराम चौक-येवता टी पॉईंट-एमआयडीसी मार्गे-अप्पु पॉईंट पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वरुन मुर्तिजापूर या मार्गाने वळविण्यात येईल.
तसेच मुर्तिजापूर कडून पिकेव्ही मार्ग-नेहरु पार्क-बसस्थानकाकडे येणारी वाहतुक अप्पु पॉईेट-येवता टी पॉईंट-मलकापूर-तुकाराम चौक-हुतात्मा चौक-नेहरु पार्क-बसस्थानक या मार्गाने वळविण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ