शाळकरी विद्यार्थ्यांनी भरले मतदार जनजागृतीचे रंग


             अकोला,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.१९ रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी  होऊन मतदार जनजागृतीचे रंग भरले.
मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत  मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१९ रोजी  सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम  येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तथापि पावसामुळे ही स्पर्धा विविध शाळांमध्ये घेण्यात आली. यावेळी  अकोला शहरातील १११ विद्यालयांतील इयत्ता ७ वी, ८ वी  व ९ वी या वर्गातील  सुमारे १० हजार  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश अंधारे यांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ