परवाना नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज; कारखानदारांना आवाहन

                अकोला,दि.18 (जिमाका)- कारखाने अधीनीयम 1984 अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व   कारखानदारांनी  वर्ष 2020 करीता परवांना  नुतनीकरणासाठी  दि. 31 ऑक्टोबर  पुर्वी ऑनलाईन (Online) प्रणाली व्दारे अर्ज  सादर करावा, असे आवाहन वि.वा निकोले प्रभारी सह संचालक, औद्योगीक  सुरक्षा व  आरोग्य, अकोला विभाग अकोला यांनी केले आहे.
                ऑनलाईन प्रणाली व्दारे अर्ज  करण्यासाठी  maitri.mahaonline.gov.in/ aplesarkar.mahaonline.gov.in /lms.mahaonline.gov.in  या संकेत स्थळावर भोगवटादाराने  युजर आयडी तयार करून अद्यावत माहिती, परवाना शुल्क तसेच आवश्यक दस्तावेज अपलोड करून अर्ज भरावा. उपरोक्त ऑनलाईन  पध्दतीने  नमुना. 1 मध्ये माहिती  भरून  झाल्यानंतर त्याचे प्रिंटआऊट  काढुन त्यावर  भोगवटादार  व व्यवस्थापक  यांची स्वाक्षरी  घेवून सदर नमुना क्रं 1  ऑनलाईन  पद्धतीने पुन्हा अपलोड  करण्यात यावा. यापुढे आता कारखाना  व्यवस्थापनाकडून कोणत्याही  कागदपत्रांच्या हार्ड कॉपी घेण्यात येणार नाही. व ऑनलाईन पध्दतीने   प्राप्त झालेल्या अर्जांचाच  विचार करण्यात येईल. नियमानुसार दि. 31 ऑक्टोबर च्या नंतर प्राप्त  होणाऱ्या आवेदनावर अनुक्रमे  नोव्हेंबर   2019  पासुन मार्च 2020  पर्यंत  प्रति माह किमान 5%   प्रमाणे विलंब शुल्क  आकारले जाईल, याची सर्व  कारखानदारांनी  नोंद घ्यावी,  तसेच विलंब शुल्क व  कायदेशीर  कारवाही टाळण्यासाठी  दि. 31 ऑक्टोबर पुर्वी  (वरील नमुद केलेल्या पध्दतीने ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज सादर करावा.
            ज्या कारखान्यांना  कारखाने अधीनियम लागु होतो अशा कारखान्यांचे भोगवटादारांनी त्वरीत या  कार्यालयाकडे परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन  प्रणालीव्दारे  नोंदणीसाठी अर्ज सादर  करावा.  तसेच सर्व कारखानदारांना  कळविण्यात  येते की, कारखान्याचे इमारतीचे व संयंत्राचे नकाशे मंजुरीकरीता ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ