दिव्यांगांचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार...






अकोला,दि.23 (जिमाका)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ही        91 टक्के पर्यंत वाढली असुन ही टक्केवारी संपूर्ण राज्यात सर्वाधिक असण्याचा अनुमान आहे. ही बाब निश्चितच अकोला जिल्हा प्रशासनाला व ही कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे.
गत लोकसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी अमरावती विभागातून सर्वाधिक ठरली होती. या बाबीचा गौरवपूर्ण उल्लेख विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार व मतदार साक्षरता अभियानाचे  निरीक्षक पियुष सिंह  यांनी वेळोवेळी केलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी शंभर टक्के पर्यंत नेण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनाने करावेत, असे आवाहन त्यांनी केले होते.
त्या आवाहनानुसार आज जिल्ह्याची दिव्यांग मतदार मतदान ची टक्केवारी ही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा एकोणवीस टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत झाली आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदार साक्षरता अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी आयुष प्रसाद व उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी अत्यंत काटेकोर व सूत्रबद्ध नियोजन करून प्रत्येक दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून ,त्यांना मतदाना करीता प्रवृत्त करून व त्यांचे प्रत्यक्ष मतदान घडवून आणण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली होती. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मतदान केंद्रांवर निर्माण केल्या होत्या ,त्याचाच परिपाक म्हणून ही विक्रमी टक्केवारी आपण गाठू शकलो.
यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या व्यक्ती ,संस्था व संघटनांच्या काल तातडीने गौरव सोहळा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आला होता  या सोहळ्यात दिव्यांग आर्ट गॅलरीचे प्राध्यापक        डॉ. विशाल कोरडे ,महाराष्ट्र अपंग कर्मचारी व अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय बरडे ,जिल्हा सचिव मोहम्मद अजीज ,राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे प्रकाश अवचार, गजानन भिरड ,टी एस गुंजकर, मोहम्मद हयात ,मानवता बहुउद्देशीय संस्था अकोट चे संजय शेळके ,परिस बहुउद्देशीय संस्थेचे श्रीकांत तळोकार, अकोला जिल्हा ऑटो चालक श्रमिक कामगार संघटनेचे इलियास खान लोधी,  संतोष शर्मा , गोपाल इंगळे,  सय्यद मशीन व संघटनेच्या सर्व सदस्यांचे तसेच शासकीय आश्रमशाळा कर्मचारी अधिकारी संघटनेचे महादेव इंगोले, विशेष शिक्षक बोनगिनवार यांना जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
 तसेच दिव्यांग मतदार नोडल अधिकारी  उपशिक्षणाधिकारी  वसतकार व सहाय्यक नोडल अधिकारी प्रकाश अंधारे यांचाही   जिल्हाधिकारी  यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग मतदारांची मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी परिश्रम घेतल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण यंत्रणेचे व सर्व संस्था व संघटनांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांनी व आभार प्रदर्शन श्री वसतकार यांनी केले.
                                                000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम