स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी रंगभरण स्पर्धा



             अकोला,दि.16(जिमाका)-  विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.19 रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा सकाळी 8 वाजता लाल बहाद्दूर शास्त्री स्टेडीयम  येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत इयत्ता 7 वी, 8 वी  व 9 वी या वर्गातील सुमारे 10 हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत या  विद्यार्थ्यांच्या सहभागातुन रंगभरण स्पर्धा  व मतदानाचा लोगो  भव्य स्वरूपात साकारण्यात येणार असल्याची माहिती  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिली. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  जबाबदारी पार पाडण्यासाठी  समिती  निर्माण करण्यात आली आहे.  आज दि. 16 रोजी  अपर जिल्हाधिकारी  यांच्या दालनात  समितीची  सभा  आयोजीत करण्यात आली होती  यावेळी  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव,  मनपाचे प्रतिनीधी राजुरकरसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
 मतदार जनजागृतीसाठी स्वीपउपक्रमाअंतर्गत  मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.19 रोजी  सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम  येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  अकोला शहरातील होतील. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून ड्रॉइंग शीट पुरविण्यात  येणार असून  रंगभरणाचे साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. रंगभरणासाठी विद्यार्थी रंगीत पेन्सिल, क्रेऑन पेन्सिल, वॉटर कलर इ. कोणतेही साहित्य वापरू शकतात.  स्केच पेन चा मात्र वापर करता येणार नाही.
याबाबत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात आले असून  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले आहे.
०००००               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ