निर्धारित दरापेक्षा जादा दर आकारले;मोटार वाहन वायू प्रदुषण तपासणी केंद्राचे प्राधिकार पत्र रद्द


              अकोला,दि.४(जिमाका)-  निर्धारित केलेल्या दरांपेक्षा जादा दर आकारुन वाहनांची वायु प्रदूषण तपासणी करुन  दिल्याप्रकरणी न्यू कोठारी पी.यु.सी. सेंटर या वायुप्रदूषण केंद्राचे प्राधिकार पत्र १५ दिवसांसाठीनिलंबित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली आहे.
            यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोटार वाहन अधिनियम १९८८ मधिल तरतुदीनुसार मोटार वाहनाची वायु  प्रदुषण  तपासणी करुन प्रमाणपत्र  देण्याचे अधिकार  वायू प्रदूषण तपासणी  केंद्रांना देण्यात आले आहेत.केंद्र शासनाच्या  रस्ते व सडक  परिवहन महामार्ग मंत्रालयाव्दारे निर्गमीत अधिसुचनेन्वये अकोला  जिल्ह्यातील सर्वच वायु  प्रदुषण  तपासणी केंद्राचे संगणीकरण  करण्यात आले असुन वाहनांना  ऑनलाईन  पद्धतीने वायु प्रदुषण  तपासणी  प्रमाणपत्र देण्यात येत आहे,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.  
            वायुप्रदुषण तपासणीचे ठरवून दिलेले दर याप्रमाणे-
             दुचाकी वाहन  दर ३५ रुपये , पेट्रोल वरील तिनचाकी वाहने –७०रुपये, पेट्रोल/सिएनजी/एलपीजीवर चालणारी चार चाकी वाहन   दर–९०रुपये, डिझेलवर चालणारी वाहने  दर–११० रुपये.
                     या निर्धारीत दरापेक्षा जास्त दर आकारल्याबाबत न्यु कोठारी पी.यु.सी. सेंटर अकोल्याच्या या  कार्यालयात वाहनधारकाकडून  तक्रारी  प्राप्त  झाल्यामुळे  न्यु कोठारी  पी.यु.सी. सेंटर अकोलाचे प्राधिकार पत्र १५दिवसाकरीता निलंबीत  करण्यात आले आहे,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ