मतदार जनजागृतीसाठी रंगभरण स्पर्धा; शहरातील १० हजार विद्यार्थी होणार सहभागी


             अकोला,दि.१५(जिमाका)-  विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.१९ रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे  जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत  मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१९ रोजी  सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम  येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  अकोला शहरातील इयत्ता ७ वी, ८ वी  व ९ वी या वर्गातील सुमारे १० हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून ड्रॉइंग शीट पुरविण्यात  येणार असून  रंगभरणाचे साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. रंगभरणासाठी विद्यार्थी रंगीत पेन्सिल, क्रेऑन पेन्सिल, वॉटर कलर इ. कोणतेही साहित्य वापरू शकतात.  स्केच पेन चा मात्र वापर करता येणार नाही.
याबाबत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात आले असून  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ